Type to search

Featured सार्वमत

नगर: कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – घरातून कॉलेजला गेलेली अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. तिचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय तिच्या वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.

अण्णाभाऊ साठे वसाहत (सिद्धार्थनगर) येथील मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. गायत्री नावाची मुलगी ही सोमवारी राधाबाई काळे महाविद्यालय तारकपूर येथून बेपत्ता झाली. सोमवारी सकाळी ती राधाबाई काळे कॉलेजला गेली. दुपारी ती घरी परत आलीच नाही. कुटुंबियांनी नातेवाईक अन् तिच्या मैत्रिणीकडे तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. कोणीतरी तिचे अपहरण केले असावे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सावेडीतूनही अपहरण
सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!