प्रेमासाठी भावजईने केली नणंदेची हत्या; बेपत्ता युवतीच्या खुनाला फुटली वाचा

0
कवडदरा । अकोले तालुक्यातील बारी (जहागिरदारवाडी) या गावातील आठवड्यापासून बेपत्ता झालेल्या एका अठरा वर्षीय युवतीचा मृतदेह इगतपुरी तालुक्यात आढळून आला.

युवतीची हत्या झाल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यास राजूर पोलिसांना यश आले असून अनैतिक प्रेमसंबधात अडसर असणार्‍या नणंदेचाच भावजईने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले.

अकोले आणि इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवर असणार्‍या बारी गावाच्या जहागिरदारवाडी येथील फशाबाई गोगा खाडे ही बारावीत शिकणारी युवती नवरात्रीच्या काळात बेपत्ता झाली होती.

तिच्या पालकांनी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची फिर्याद राजूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत एका संशयितास अटक केली. आपले अनैतिक प्रेमसंबध कोणाला समजू नये यासाठी भावजईने खुन केल्याचे समोर आले.

सातव्या माळेला फशाबाई सकाळी साडेसात वाजता आपल्या कळसुबाई माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालय कॉलेजात जाण्यासाठी रस्त्यानी जात असताना नामदेव व त्याचा मित्र गणेश रोहीदास खाडे हे कॉलेजच्या मार्गातच तिची वाट पाहत दबा धरुन बसले होते.

फशाबाई येताना दिसताच नामदेव व गणेशने तिच्यावर हल्ला केला. तिचा गळा दाबून खून केला व मृतदेह गोणीत घालून इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावालगत घनदाट जंगलात दुरवर एका कपारीत ठेऊन टाकला.

दरम्यान, याबाबत राजूर पोलीस ठाण्यात खुनाची व घोटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पालिसांनी नामदेव तुकाराम खाडे, गणेश रोहीदास खाडे यांच्यासह भावजई अनिता या संशयितावर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

संशयिताकडून खुनाची कबुली : पोलीस तपासात नामदेव तुकाराम खाडे या संशयिताचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्यांने खून केल्याची कबुली दिली. दरम्यान भावजई अनिता आणि नामदेव यांच्यात काही वर्षापासून अनैतिक संबंध होते याची मयत फशाबाईला माहिती झाले. तिने घरच्याना सांगितले होते त्यानंतर भावजईला घरच्यांकडून तंबीदेखील मिळालेली होती.

LEAVE A REPLY

*