Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : दोन दिवसांपासून बेपत्ता मुलीचा शेततळ्यात आढळला मृतदेह

Share

लोहोणेर | वार्ताहर 

देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेली कीर्ती रमेश अवस्थी ( वय १७ ) या अल्पवयीन मुलीचा मृदेह शेततळ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, सावकी येथील कीर्ती रमेश अवस्थी ही मुलगी दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत देवळा तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, दोन दिवसांच्या कालावधीनंतर आज(दि.२१)  सकाळी अकरा वाजता सावकी फाटा रस्त्यावर रायगड नगर येथील शेतकरी बापू गोकुळ तिवारी यांच्या गट नंबर २६५ मध्ये असलेल्या शेततळ्यात कीर्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला होता.

बेपत्ता मुलीचा मृतदेह शेततळ्यात आढळून आल्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. सकाळी पोलीस यंत्रणा दाखल झाल्यानंतर शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

त्यानंतर देवळा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदानासाठी नेण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यांनतर मृतदेह मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!