Type to search

नाशिक

देवळालीतून हरविलेला मुलगा कर्जतला सापडला

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

येथील सहाचाळ परिसरातून रविवारी बेपत्ता झालेला बारावर्षीय अनिल रमेश पवार हा मुलगा कर्जतच्या वानगी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचला. त्याच्या अंगातील कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेचा शर्ट बघून तेथील पोलीसांनी देवळाली कॅम्प पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान कॅम्प पोलीसांनी पालकांच्या मुलगा हरवल्याच्या तक्रारीवरून फोटो व्हायरल केला होता. त्याचा लाभ होऊन मुलगी वेळीच हाती लागला. पालकांनी कर्जत येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले.

रविवारी सकाळी सकाळच्या सुमारास अनिल हा लगतच्या आनंदरोड मैदानावर घरच्यांसोबत गेला असताना तेथून तो देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक ते कर्जत रेल्वे स्थानक पर्यंत कसा पोहोचला याबाबत त्यालाही काही सांगता येत नव्हते. मात्र पोलीसांच्या तत्परतेने वानगी रेल्वे पोलिसांना मिळालेली माहितीनुसार अनिल यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता तो गोंधळून गेला.

त्याच्या शर्टावरील कॅन्टोन्मेंट हायस्कूलचे नाव यावरून त्यांनी देवळाली कॅम्प पोलीसांना माहिती दिली. येथील वपोनि देविदास वांजळे यांनी मुलाच्या पालकांना बोलावून कर्जत येथे जाण्यात सांगितले. रात्री पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन ओळख पटवून अनिल यास सुखरूप घरी घेऊन आले. सोशल मिडियामुळे मुलगा हरवला व सापडल्याचा संदेश व्हायरल झाल्याने अनिल वेळीच पालकांच्या ताब्यात मिळाला. पोलीसांच्या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!