‘या’ मराठमोळ्या तरुणीने केले मिस वर्ल्डचे ड्रेस डिझाईनिंग!

0

मानुषी छिल्लरने यंदाचा ‘मिस वर्ल्ड’ खिताब जिंकला.

मानुषी छिल्लर जेव्हा विश्वसुंदरी स्पर्धेत उतरली, तेव्हा यवतमाळची शिफा जलाल गिलानी मानुषीची अधिकृत असोसिएट स्टायलिस्ट बनली.

यवतमाळचे प्रसिद्ध असामी जानमहंमद गिलानी यांची ही नात. तर जलाल आणि मुनिझा गिलानी यांची लेक. यवतमाळच्या महिला विद्यालयात, सेंट अलॉयसियसमध्ये शिफाने प्राथमिक शिक्षण घेतल्यावर पाचगणीच्या संजीवन विद्यालयात, नागपूरच्या सेंटर पॉर्इंट स्कूलमध्ये ती शिकली.

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन येथून शिफाने फॅशन कम्युनिकेशन विषयाची पदवी मिळविली.

अलिकडेच लंडन कॉलेज आॅफ फॅशनमधून शिफाने फॅशन मिडिया प्रॉडक्शनची पदव्यूत्तर पदवी प्राविण्यासह मिळविली आहे..

यवतमाळची शिफा मुंबईत स्थायिक झाली आहे

LEAVE A REPLY

*