‘मिस अर्थ इंडिया’ हेमल इंगळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज

0

सौंदर्यस्पर्धा जिंकल्यावर बऱ्याच विजेत्या सुंदरीं चित्रपटसृष्टीकडे वळतात.

अशीच एक सौंदर्यस्पर्धेची विजेती आपल्या मातृभाषेतील चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकतेय. ‘मिस अर्थ इंडिया’ चा मुकुट संपादन केलेली हेमल इंगळे मराठी चित्रपट ‘आस’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

कोल्हापूरमध्ये वाढलेल्या मराठमोळ्या हेमल इंगळेने पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला.

दिल्लीत रंगलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून पाच तर देशभरातून 35 मुलींनी भाग घेतला होता आणि अंतिम फेरीत हेमल भारताची प्रतिनिधी म्हणून अव्वल ठरली होती.

त्यानंतर तिने सातासमुद्रापार अमेरिकेत होणाऱ्या ‘मिस अर्थ वर्ल्ड’ या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

 

LEAVE A REPLY

*