Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एअरगनच्या छर्‍याने अल्पवयीन नेमबाज जखमी

Share

नाशिक । प्रतिनिधी

एअरगनमधून नेमबाजीचा सराव करणार्‍या अल्पवयीन नेमबाजाने गनमधून छरार्र् सोडला असता, तो भिंतीला जावून आपटल्याने पुन्हा परत येऊन त्याच्या छातीला चाटून गेल्याने तो जखमी झाल्याची घटना निफाड येथे (दि. 6) सायंकाळी घडली.

प्रसाद देविदास बैरागी (14, रा. निफाड, नाशिक) असे या अल्पवयीनाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा अल्पवयीन नेमबाज असून नेमबाजीत पारंगत आहे. त्याने शालेय स्पर्धेत सुवर्णपदक देखील मिळविले आहे.

प्रसाद हा नगर जिल्ह्यातील नेवासा येथे सैनिकी शाळेत शिकत असून तो राष्ट्रीय नेमबाज आहे. सुट्टी लागल्याने तो निफाडला घरी आला होता. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तो घरात एअरगनमधून सराव करीत होता. त्यात एअरगनमधून सुटलेला छर्रा भिंतीला आपटून विरुद्ध दिशेने येत त्याच्या छातीस लागला.

घटना लक्षात आल्यावर त्याच्या पालकांनी त्यास तातडीने निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात एक्सरे काढल्यानंतर त्यास गंभीर दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले. रूग्णालयाचे अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गायधनी यांनी प्रसादवर उपचार सुरु केले. त्याच्यावर सध्या जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय आधिकार्‍यांनी सांगितले आहे.


प्रसादच्या बरगडीस गोळी लागली असून गंभीर दुखापत झालेली नाही. प्रसादचा रक्तदाब आणि प्राणवायू नियंत्रणात आहे. घाबरण्याचे कारण नाही.

डॉ. निखील सैंदाणे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!