पेठ तालुक्यातील वांगणी आश्रमशाळेची भिंत पडून बालक जखमी

0

पेठ (प्रतिनिधी) ता. ४ : तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वांगणी निवासी आश्रमशाळेत सकाळी  साडेदहाच्या दरम्यान १लीच्या वर्गात शिकणारा राहूल हेमराज खुरकुटे, वय ६ वर्ष याचे अंगावर व्हरांड्याची भिंत कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला.

 त्यास पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  प्रकृती गंभीर असल्याने तेथून थेट आडगावच्या मेडीकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.

या बाबत यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळा भरण्याचे सुमारास राहुल त्याचे वर्गात आला होता . मात्र काही कारणासाठी पुन्हा वसतीगृहात गेला असता वसतीगृहास पीठ पुरवणाऱ्या वाहनाच्या धक्क्याने वसतीगृहाचा कथडा ढासळला. नेमका त्याच वेळी राहून तेथे सापडल्याने जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*