Video : मराठा हायस्कूल केंद्रावर किरकोळ वाद

0
प्रकृती अस्वाथ्यामुळे मतदान वेळेच्या अंतिम क्षणी निंबा शिंदे नावाचे सभासद अ‍ॅम्बुलन्समधून मतदान स्थळी दाखल झाले.

यावेळी मतदानाची वेळ संपली असल्याचे सांगत उपस्थितांमधील काही सभासदांनी अ‍ॅम्बुलन्सची वाट अडवली. तर दोन मिनिटे वेळ शिल्लक असल्याचे सांगत काहींनी अ‍ॅम्बुलन्सची वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे अंतिम क्षणी मराठा हायस्कूलच्या मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ किरकोळ वाद झाला. मात्र दोन मिनिटांचा वेळ शिल्लक असल्याने निवडणूक मंडळाने शिंदे यांना मतदान करू दिले.

 

LEAVE A REPLY

*