Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अल्पवयीन गुन्हेगारी वाढली; दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत दिली धमकी

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. वाढत्या गुन्हेगारीत आता अल्पवयीन गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज नाशिकरोड परिसरात दोन संशयितांनी अल्पवयीन मुलीला लग्नाची गळ घातली. लग्न नाही केले तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने घरी हा प्रकार घरी सांगितला. पालकांनी गंभीर प्रकार उपनगर पोलिसांपुढे कथन केल्यानंतर दोन्ही संशयितांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोन्हीही संशयित प्राथमिक माहितीनुसार अल्पवयीन असल्याचे समजते. एवढ्या कमी वयात त्यांच्याकडे बंदूक आली कशी?  या दोन्ही संशयितांवर कुणाचा वरदहस्त आहे? याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!