Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

मंत्रालयात दोन दिव्यांग शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

Share

मुंबई-  आज दुपारी मंत्रालयात आत्महत्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. या आधीही विविध मागण्यासाठी आत्महत्याचा प्रकार घडला आहे. मंत्रालयच्या दुसर्‍या मजल्यावरून दोन दिव्यांग शिक्षकांनी खाली उडी मारली. परंतु मंत्रालयात जाळी बसवल्याने त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी या दोन शिक्षकांची नावं आहे.

300 विनाअनुदानित शाळांना मान्यता देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात भेटीसाठी आले होते. मात्र मंत्र्यांची भेट झाली नाही त्यामुळे दोन शिक्षकांनी उडी मारली. मंत्रालयात जाळी लावण्यात आलेली असल्याने या दोघांना काहीही झालं नाही. मात्र त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अपंग शाळेतले हे शिक्षक आहेत. 300 विनाअनुदानित शाळांना अनुदान मान्य करावं अशी मुख्य मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

याआधीही अशा प्रकारे मंत्रालयात आत्महत्या करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयाच्या मधल्या भागात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आली आहे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!