Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशदेशात आता शिक्षण मंत्रालय !

देशात आता शिक्षण मंत्रालय !

संगमनेर | वार्ताहर | Sangamner

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय या खात्याचे नावात बदल करण्यात आला आहे. यापुढे शिक्षण मंत्रालय असेल संबोधण्यात येणार आहे. यासंदर्भातील राजपत्र भारत सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारत सरकारच्या वतीने 34 वर्षानंतर नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा करण्यात आली होती .के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सादर झाल्यानंतर मागीला पंधरा दिवसापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली होती. नवीन धोरणानंतर देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अस्तित्वात येणार आहेत. तर काही संस्था संपुष्टात येणार आहेत. धोरणात मोठ्याप्रमाणात बदलांची भूमिका घोषित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरण सूचित केलेले मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नामांतर करून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले आहेत. नवे शैक्षणिक धोरण नंतर राष्ट्रीय स्तरावर झालेला पहिला बदल आहे. त्यासंबंधातील भारत सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालय हे नाव आता इतिहास जमा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या