Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात; तरुणाचा मृत्यू, घटनास्थळी तणाव

Share

सोलापूर | वृत्तसंस्था

सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण असून तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सावंत यांच्या गाडीने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती संपूर्ण सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांआधी हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघाता झाला होता. या अपघातामध्ये 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता.

जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याचे सांगण्यात आले आहे. भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.श्याम होळे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण हा बार्शीतील शेलगाव होळे गावातील रहिवाशी असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!