Type to search

maharashtra मुख्य बातम्या

पक्ष सोडला, तरी फरक पडणार नाही; गिरीश महाजनांचा रोख एकनाथ खडसेंकडे ?

Share

जळगाव –  मी म्हणजे पक्ष असे ज्यांना कोणाला वाटत असेल, त्यांनी पक्ष सोडून गेले तरी कोणताही फरक पडणार नाही, असा इशारा राज्याचे जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीतच दिला. महाजन म्हणाले की, काँग्रेस पक्ष म्हणजे गांधीचा तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारांचा पक्ष असे म्हटले जाते. परंतु भाजपमध्ये कोणतीही घराणेशाही नाही. पक्षात मी म्हणजे पक्ष असे ज्यांना वाटत असेल त्यांनी पक्ष सोडून गेले तरी कोणताही फरक पडणार नाही, असा इशाराचा त्यांनी दिला. दरम्यान, महाजन यांचा हा इशारा खडसे यांना उद्देशून होता का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांना पुनरागमन होण्याची आशा होती. मात्र, त्यांची वर्णी लागली नाही. त्यानंतर खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना भाजपमध्ये आलेल्या आयाराम गयारामांना मंत्रिपदे दिली जात आहेत, असे म्हटले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!