खाजगी दूध व्यावसायिक व खाजगी दूध संकलन संस्थांना भविष्यात चाप लावणार : दुग्धविकास मंत्री  महादेव जानकर 

0

ब्राह्मणवाडा :  ग्रामीण भागातील खाजगी दूध व्यावसायिक व खाजगी दूध संकलन संस्थांना भविष्यात चाप लावून सहकारी दूध उत्पादक संस्थांना बळकटी देणार असल्याचे वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले.

मंत्री जानकर रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक दिपक गायकर यांच्या कौटुंबिक भेटीसाठी आले होते. त्यांची ही खाजगी भेट होती.

त्यानंतर त्यांनी येथील श्रीकृष्ण दुध उत्पादक संस्था,दुध शीतकरण केंद्र व ग्रामपंचायतीस भेट दिली.

एका छोट्याशा खेडेगावातील अडीच हजार लिटर दुध संकलन व शीतकरण केंद्र पाहून ते थक्क झाले.त्यावेळी पंचक्रोशीतील दुधउत्पादक व ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

येथील श्रीकृष्ण दुध उत्पादक संस्थेचे संस्थापक संचालक गोकूळ आरोटे यांनी गाईच्या दुधास किमान तीस रुपये भाव करण्याची मागणी केली. मंत्री जानकर यांनी भविष्यात ३.५ व ८.५ गुणप्रतिच्या दुधास तीस रुपये भाव वाढ करण्याचे आश्वासन दिले.

हे सरकार दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देईल तसेच त्यांच्या पाठीमागे उभे राहील असे सांगून ब्राह्मणवाडा गावचा परिसर,प्रतिकूल परिस्थितीवर कष्ट आणि मेहनतीने मात करणाऱ्या येथील शेतकऱ्यांचे जानकर यांनी कौतुक केले.

 

 

LEAVE A REPLY

*