ध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व

0
मालेगाव तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करत केला. सिंचनासह पिण्याचे पाणी, रस्ते, घरकुल, वीज, शिक्षण व रोजगार आदी प्रश्नांकडे विशेष लक्ष दिल्याने या क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे.  गिरणा-मोसम नद्यांवर तब्बल 9 बंधारे मंजूर करून आणले. पश्चिम औद्योगिक वसाहतीसाठी 886 एकर जागा मंजूर करून घेली आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. पूर्ण क्षमतेने पश्चिम औद्योगिक वसाहत कार्यान्वित होण्याच्या दृष्टिकोनातून आपला पाठपुरावा सुरू आहे.

दादा भुसे, राज्यमंत्री

कामे झाल्यावरच त्याची माहिती जाहीर करणे हा आपला पिंड आहे. जनतेच्या अपेक्षेनुसारच विकासकामे करत आहोत. गावठाण व शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय लाखो गोरगरीब जनतेस घरांचा अधिकार मिळवून देणारा ठरणार आहे.

अपर जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन कार्यालय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यात 75 कोटी निधीव्दारे रस्त्यांची निर्मिती, गिरणा-मोसम नदीवर पुल, 60 सामाजिक सभागृह, वसतिगृहे, वीज वितरणचे जिल्हास्तरीय मंडल कार्यालय, तळवाडे साठवण तलावाच्या क्षमतेत वाढ, गिरणा-मोसम नदीवर 9 बंधारे, 226 सिमेंट-मातीनाला बांध, शंभर खाटांचे महिला व बाल रुग्णालय, नर्सिंग कॉलेज, भव्य उद्यान, क्रीडा संकुल, अभ्यासिका, तंत्रशिक्षण विद्यालय इमारत, नदीजोड प्रकल्प, तालुक्यातील 70 टक्के शाळा दुरुस्ती, डिजिटल व इ लर्निंग, पंचायत समिती कार्यालय इमारत, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत गाळणे गोरक्षनाथ मंदिर, रोकडोबा हनुमान, श्रीक्षेत्र चंदनपुरी, सप्तश्रृंगीगड व धनदाई माता मंदिर म्हसदी या तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा, आदिवासी-मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना वसतिगृह, गडबड येथे आश्रमशाळा, तालुका पोलीस ठाणे इमारत, ठिकठिकाणी वीज उपकेंद्रे, माळमाथा 25 गाव पाणीपुरवठा योजना, तळवाडे तलावातून दाभाडी गावास पिण्याचे पाणी, हद्दवाढ भागातील विकासकामांसाठी निधी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजंग शिवारात शेती महामंडळाच्या 863 एकर जागेवर पश्चिम औद्योगिक वसाहतीस मंजुरी आदी प्रमुख कामांसह हजारो घरकुलांचे वाटप, पथदीप, व्यायामशाळा, आदिवासींना साहित्य वाटप, शिधापत्रिका, विविध दाखल्यांचे वाटप, निराधारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

गावठाण व शासकीय अतिक्रमित घरे नियमानुकूल व्हावीत, यास्तव गत 12 वर्षांपासून संघर्ष व पाठपुरावा सुरू होता. हा विषय फक्त मालेगाव तालुक्यापुरता नव्हे, तर संपूर्ण राज्यातील अतिक्रमित जागेवर घर असलेल्यांचा होता. अतिक्रमणे मोजणीचे काम पूर्ण झाले होते. परंतु ती नियमित करण्याचा निर्णय होत नव्हता. पाठपुरावा सुरुच होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या विषया संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात आपण संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेत धोरण निश्चित करून प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामविकास विभागाने 16 फेब्रुवारी 2018 रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मालेगाव तालुक्यातील 15 हजारांवर लोकांची घरे त्यांच्या नावावर होणार आहेत. राज्यात लाखो अतिक्रमण धारकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयानुसार 2000 सालापूर्वीची 500 चौरसफुटापर्यंतची घरे कोणतेही शुल्क न आकारता व 500 चौरसफुटावरील घरे शुल्क आकारून नियमित करून दिली जाणार आहेत. यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे माहिती संकलित होऊन अतिक्रमित जागेवरील घरांचा कायदेशीर हक्क संबंधितांना प्राप्त होणार आहे.

शहरातील व तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दैयनीय होती. त्यामुळे आमदार निधीसह शासनाच्या वेगवेगळ्या योजनांव्दारे निधी आणत रस्त्यांची कामे मार्गी लावली जात आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात 76 कि.मी. रस्त्यांसाठी 42.31 कोटी तर दुसर्‍या टप्प्यात 31.5 कि.मी.साठी 15.44 कोटी निधीची कामे मंजूर झाली आहेत. तिसरा टप्पा 70 कि.मी.चा शासनाकडे प्रस्तावित असून, तोदेखील निश्चितच मंजूर होईल. तालुक्याचा रूरबन योजनेत समावेश करण्यात आल्याने विविध कामे मार्गी लागणार आहेत. शहराला जोडणार्‍या गिरणा नदीवरील पल अत्यंत कमकुवत झाला होता. त्या ठिकाणी समांतर पूल कार्यान्वित झाला आहे. मालेगाव-डोंगराळे, कुसुंबामार्गे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला असून, गिरणा नदीवर सोयगाव-टेहरे दरम्यान तसेच आघार बु. ते आघार खु. व मोसमनदीवर कॅम्प ते वडगाव, काष्टी ते निळगव्हाण या कोट्यवधी रुपयांच्या निधीव्दारे पुलांची निर्मिती करण्यात आली असल्याने दळणवळणाची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

शहर-ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील दुरवस्था दूर होण्यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालय दुरुस्ती व सुविधांसाठी नुकताच शासनातर्फे 37 आरोग्य उपकेंद्रांच्या दुरूस्ती नुतनीकरण व सुविधांसाठी राष्ट्रीय अभियान आरोग्य आयुक्तांनी 2 कोटी 59 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरात महिला व बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय होणे गरजेचे असल्याने शंभर खाटांचे महिला व बाल रुग्णालयास मंजुरी मिळवून आणत रुग्णालय इमारत नूतनीकरणासाठी अडीच कोटीचा निधीदेखील मंजूर झाला आहे. मालेगाव येथे नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळवून घेत; भव्य इमारत पूर्ण करण्यात आली आहे.

नार-पारसारख्या योजना आवश्यक आहेत. परंतु, त्यांचा खर्च लक्षात घेता लहान-लहान योजना हाती घेऊन सिंचनाचा प्रश्न सोडविणे फायदेशीर ठरेल या जाणिवेतून आपण गिरणा व मोसम नदीवर 9 बंधारे पाठपुरावा करत मंजूर करून घेतले आहे. मोसमनदीवर वडेल, काष्टी केटीवेअर बंधार्‍याचे काम पूर्ण झाले असून, वडगाव व कोठरे केटीवेअर बंधार्‍यांचे काम प्रगतीपथावर आहे. वडनेर केटीवेअर बंधारा शासनाकडे प्रस्तावित असून, त्यास देखील लवकरच मंजुरी मिळेल. नदी पुनर्जीवन योजनेंतर्गत कान्होळी, परसुल, दोध्याड, बोरी व गलाठी या नद्यांवर 33 बंधारे कार्यान्वित झाले आहेत. 8 बंधारे मंजूर असून, 56 प्रस्तावित आहेत.

लयुक्त शिवार योजनेंतर्गत गत तीन वर्षात तालुक्यात 226 सिमेंट व मातीनाला बांधकामे करण्यात आली. मालेगाव शहरास तळवाडे साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. या तलावाची पाणी साठवण क्षमता पूर्वी फक्त 42 द.ल.घ.फूट इतकी होती. शेती महामंडळाची शंभर एकर जागा मंजूर करून आणत या साठवण तलावाची क्षमता वाढवली गेली. यासाठी 5.80 कोटीचा निधी आपण मंजूर करून आणला. या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्याने आज तळवाडे तलावाची साठवण क्षमता 87 द.ल.घ.फूट इतकी झाली आहे.

या तळवाडे साठवण तलावातून दाभाडी गावास पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. या संदर्भात महानगरपालिकेने नुकताच ठराव देखील केला आहे. तलावाच्या साठवण क्षमतेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असला, तरी शेती सिंचनासाठी चणकापूरचे एक आवर्तन अधिक वाढणार आहे. शहरात हद्दवाढ झालेल्या भागात पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. जलकुंभांची निर्मिती अगोदरच झाली असून; जलवाहिनीचे काम पूर्ण होताच सर्व शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा लवकरच सुरू होवू शकेल.
पश्चिम औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

LEAVE A REPLY

*