Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाच नाही; चंद्रकांत पाटलांची पलटी

Share

सांगली – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये आमचं सर्व ठरले आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी सांगितले होते, परंतू भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला अद्याप तरी ठरलेला नाही, असा दावा करत चंद्रकांत पाटील यांनी पलटी मारली आहे. औरंगाबादमध्ये दुष्काळी दौर्‍यांवर असताना चंद्राकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतना म्हणाले होते की, युती बाबत आमचं सर्व ठरले आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी घटकपक्षाला 18 सोडणार तर 133-135 जागा शिवसेना-भाजपा लढतील असे तेव्हा सांगितले होते.

मात्र चंद्रकांत पाटलांनी आता फॉर्म्युलाच ठरला नाही, असे म्हणत पलटी मारली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सारे काही बरोबर असल्याचे दाखवत असले तरी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे युतीत बिघाड असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी भाजपा आणि शिवसेना यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्यावरून धुसफूस दिसू लागली आहे. एकीकडे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सारे आलबेल असल्याचे दाखवत आहेत. मात्र भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलाच नसल्याचा दावा, चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. लोकसभेतील बंपर यशामुळे भाजपा आणि शिवसेनेला हुरूप आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातही भाजपामध्ये विरोधी पक्षामधून जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करण्याची गरज नाही, असे मानणाराही एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मफभाजपा आणि शिवसेना युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तसेच जागावाटप करताना याधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडल्या जाणार नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामधून युतीच्या भवितव्याबाबत सूचक अर्थ काढला जात आहे.

युतीमध्ये चाललंय काय? –

एकीकडे मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं असता प्रत्येक सभेमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आम्ही बघून घेऊ, आमचं ठरलंय, असं सांगत असतानाच भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतायत जागा वाटपांचा कुठं ठरलंयफ? त्यामुळे नक्की युतीमध्ये चाललंय काय? असा प्रश्न आता सगळे विचारू लागले आहेत. लोकसभा निवडणुका होईपर्यंत युतीमध्ये सारंकाही हसत खेळत सुरू असताना आता विधानसभा निवडणुका आणि मुख्यमंत्रीपदाबाबत युतीमध्ये गोंधळ सुरू झाल्याचं देखील बोललं जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यात भरच पडली आहे!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!