नोकरी लावण्याचे अमिष दाखवून लाखों रूपयांना गंडवणारी महिला गजाआड

0
नाशिक | दि. ११ प्रतिनिधी –गोवा येथील खानीत इंजिनिअर म्हणून नोकरी लावण्याचे अमिष दाखवून नाशिक शहरातील सुमारे १५ जणांना १४ लाख २० हजारांचा गंडा घालणार्‍या महिलेस म्हसरूळ पोलीसांनी शिताफीने पुणे येथून अटक केली आहे.  रूपाली सिद्धेश्‍वर शिरूरे असे संशयीत महिलेचे नाव आहे.

डिसेंबर २०१६ ते १७ मे दरम्यान हा प्रकार घडला. शिरूरे शहरातील म्हसरूळ परिसरात राहण्यास असताना तीने येथील सोपान विठ्ठल ठाकरे यांचेशी ओळख वाढवून आपली मिलिटरीमध्ये खूप ओळख असल्याचे सांगीतले. गोवा येथील खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात इंजिनीअर्सची गरज असून तुम्हाला तेथे चांगल्या पगारावर नोकरी लावून देईल असे अश्‍वासन दिले.

यासाठी प्रथम ५० हजार रूपये घेतले व उर्वरीत रक्कम काम झाल्यावर देण्याचे ठरले. दरम्यान ठाकरे यांनी आपल्या ओळखीतील इतर लोकांना याची माहिती दिल्यानंतर यशवंत खेलमकर, संध्या म्हस्के, भाग्यश्री म्हस्के, विनोद भगवान वायकर, तुषार पवार, जगदीश डहाळे, छाया डहाळे, बाळासाहेब पवार, अक्षय सोनवणे, संतोष लोहार, किरण हिरे, सुरेश सावंत, अमित भाईल, विजय खेलमकर अशा पंधरा जणांना तीने या नोकरीचे अमिष दाखले.

त्यानुसार सर्वांनी मिळून १४ लाख २० हजार रूपये रूपाली शिरूरे यांच्या हवाली केले. दरम्यान कोणास काहीच न सांगता शिरूरे ही आपले सामान आवरून गायब झाली. यानंतर आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्याने ठाकरे व इतरांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काहीही पुरावा, संपर्क नसताना म्हसरूळ पोलीसांनी शिरूरे यांचे घरातील सामान घेऊन जाणार्‍या टेम्पो चालकास शोधून माहिती घेतली असता त्याने शिरूरे पुणे येथे राहावयास गेल्याचे सांगीतले, परंतु तेथूनही तीने जागा बदलली होती. ज्याने भाडोेत्री घर घेऊन देण्यास मदत केली या दलालाचा शोध पोलीसांनी घेतला मात्र त्यासही न सांगता ती इतरत्र निघून गेली होती. मात्र दलालाकडे दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलीसांनी तीचा शोध घेत सापळा रचून तीला पुण्यातून अटक केले.

पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल , उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र देशमुख, सहायक पोलीस निरिक्षक बेडवाल, सुप्रिया कातोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*