Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यारेशनवर गव्हाऐवजी बाजरी व ज्वारीचे होणार वितरण

रेशनवर गव्हाऐवजी बाजरी व ज्वारीचे होणार वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रेशनवर गव्हाऐवजी भरड धान्य म्हणून बाजरी व ज्वारी दिली जाणार आहे. ज्या तालुक्यात मका संपला आहे, अशा तालुक्यांमध्ये खरेदी करण्यात आलेली ज्वारी आणि बाजरी दिली जाईल. मालेगाव आणि येवला या दोन तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना एप्रिल महिन्यात ज्वारी आणि बाजरीचे वितरण केले जाणार आहे.

- Advertisement -

आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आलेले धान्य त्या-त्या जिल्ह्यात रेशनवर वितरित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गोरगरीब रेशन कार्डधारकांना शासनाकडून अल्पदरात धान्य दिली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने गह, तांदूळ, डाळ आणि साखरेचे समावेश असतो. परंतु आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडील भरड धान्याची खरेदी आधारभूत किमतीने केली जात असून, उपलब्ध झालेले धान्य रेशन द्वारे वितरित करण्याचा केंद्र शासनाचा नवा निर्णय झालेला आहे.

त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी अशी खरेदी करण्यात आलेली भरडधान्य ही गव्हा ऐवजी वितरित करण्याचं शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सध्या नाशिक जिल्ह्यातही गव्हाच्या ऐवजी मका रेशनवर दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये १लाख ५७ हजार क्विंटल मक्याची खरेदी झाली असून, जवळपास क्विंटल मका रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात आला आहे. शिवाय २४ हजार क्विंटल मका बीड आणि लातूर साठी ठेवण्यात आला आहे. त्यांनी अद्याप त्याची उचल केलेली नाही. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ११ हजार ७०० किंटल बाजरी आणि १९०० क्विंटल ज्वारीची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली आहे.

भरडधान्य ज्या तालुक्यात खरेदी करण्यात आले असेल, त्याच तालुक्यात वितरीत करण्याचे आदेश आहेत.त्यानूसार जिल्ह्यातील मालेगाव आणि येवला या दोन तालुक्यांमध्ये एप्रिल महिन्यापासून रेशनवर गव्हा ऐवजी ज्वारी आणि बाजरी वितरित केली जाणार आहे.

– अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या