दुधाचे पैसे थेट उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश

0
मुंबई | दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे आता थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. राज्यातील प्राथमिक दुध संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७९ अ अन्वये हा आदेश देण्यात आला आहे.

दुधाचे पैसे ऑनलाईन किंवा रोख स्वरुपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करावेत असे आज आदेश देण्यात आले आहेत.

यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक तसेच थेट लाभार्थी म्हणजे डीबीटी साठी केंद्राने नेमलेल्या खासगी बँका यांच्याशी संपर्क साधून संस्था तसेच सभासदांची ऑनलाईन सुविधा असणाऱ्या बँकेत खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१३ ऑगस्ट पर्यंत खाते उघडून बँकेत पैसे जमा करावेत असा आदेशच काढण्यात आला आहे. जर असे झाले नाही तर प्राथमिक सहकारी दुग्ध संस्थेविरुद्ध, सहायक निबंधक सहकारी संस्थेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*