सहकारी संघांच्या दूध दर उपायांसाठी समिती

0

10 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सहकारी दूध संघांच्या सध्याच्या दूध दरासंदर्भात येणार्‍या अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीस आपला अहवाल 10 दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील प्रमुख सहकारी दूध उत्पादक संघांच्या अडीअडचणींच्या संदर्भात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 9 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. यावेळी विविध सहकारी दूध संघांचे प्रतिनिधी हजर होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समिती गठीत करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.
त्यानुसार पदूमचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धव्यवसाय विकासचे आयुक्त, सहकारी दूध महासंघांचे व्यवस्थापकीय संचालक सदस्य असतील तर दुग्ध खात्याचे उपसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील
या समितीने राज्यातील सहकारी दूध संघांच्या सध्याच्या दूध दराबाबत येणार्‍या अडचणींसंदर्भात उपाययोजना सुचविण्यासंदर्भातील आपला अहवाल शासनास सादर करणे अपेक्षित आहे.

 

LEAVE A REPLY

*