सैनिक बँकेच्या कर्मचार्‍यांविरूध्द पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

0

वार्षिक सभेत सभासदाला मारहाण प्रकरण 

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुका सैनिक बँकेच्या वार्षिक सभेत सभासदाला मारहाणप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतरही बँकेच्या कर्मचार्‍यांकडून धमकावण्यात येत आहे.
जिवीतास धोका निर्माण झाल्याने संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पिडित सभासद विनायक गोस्वामी यांनी थेट अहमदनगर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सैनिक बँकेच्या वार्षिक सभेत प्रश्‍न विचारल्याने बँकेचे कर्मचारी अनिल मापारी, बबन फंड, प्रवीण निघुट, दत्तात्रय भुजबळ, भरत पाचारणे यांसह अन्य कर्मचार्‍यांनी जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित कर्मचार्‍यांना गुन्ह्याची माहिती समजल्यावर पुन्हा पारनेर एसटी स्टॅण्डजवळ व्यवहारे, कोरडे यांची आम्हाला साथ असल्याचे म्हणत आमच्यावर कारवाई होवू शकत नाही, असे म्हणत जातिवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
धमकीमुळे जिवीतास धोका निर्माण झाल्याने आरोपीवर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे विनायक गोस्वामी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*