हजारो मायक्रो गणेश पाहून नाशिककर मंत्रमुग्ध

0

नाशिक, ता. १९ : सुपारीवर गणेश मूर्ती, नखावरील गणेश मुर्ती,  ५१ मायक्रो हत्ती,  ८१ गणपतींची दहीहंडी अशा तब्बल ११ हजार मायक्रो गणेशमूर्ती पाहून आज नाशिककर मंत्रमुग्ध झाले.

सिन्नर येथील कलावंत संजय क्षत्रिय यांनी तयार केलेल्या तब्बल दहा हजार विविध प्रकारच्या शाडूमातीच्या मूर्तींचे प्रदर्शन शनिवार व रविवार दिनांक १९ व २० ऑगस्ट रोजी  आण्णासाहेब मुरकुटे सभागृह, मुरकुटे कॉलनी, नवी पंडित कॉलनी, गंगापूर रोड येथे आयोजित केले आहे .

या प्रदर्शनाचा आज शेकडो नाशिककरांनी लाभ घेतला. उद्याही हे प्रदर्शन खुले असणार आहे.

आजपर्यंत तब्बल ३३ हजार विविध प्रकारच्या मायक्रो गणेश मूर्ती तयार करण्याचा विक्रम देखील संजय क्षत्रिय यांनी केला आहे. यामध्ये नाचणारे गणेश , बासरी, तबला वाजविणारे गणेश आदींचा समावेश आहे.

या प्रदर्शनात देखील या मूर्ती बघावयास मिळत असून विशेष आकर्षण ठरतेय  श्री क्षत्रिय यांनी  साडे तीन लाख सुवर्ण मण्यांपासून बनविलेले अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती.

या प्रदर्शनासाठी कोणतीही प्रवेश फी नसून सकाळी दहा ते सायंकाळी दहा पर्यंत ते सर्वांसाठी खुले राहणार आहे.

LEAVE A REPLY

*