MI Mix 2 भारतात लाँच!

0

शाओमीने भारतात MI Mix 2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

या फोनची किंमत 35 हजार रुपये ठेवण्यात आली असून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी करता येईल.

MI Mix 2 भारतात 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32 हजार 300 रुपये, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35 हजार 300 रुपये, तर 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39 हजार 200 रुपये एवढी आहे.

MI Mix 2 चे फीचर्स

  • 5.99 इंच आकाराची क्वाडएचडी स्क्रीन
  • 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज
  • स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
  • 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (सोनी आयएमएक्स 386 सेंसर)
  • ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन
  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (फेशियल रिकॉग्निशन)
  • 3400mAh क्षमतेची बॅटरी

LEAVE A REPLY

*