Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच टेक्नोदूत मुख्य बातम्या

बहुचर्चित शाओमी एमआय सीसी-९ फोनचे ही आहेत खास वैशिष्ट्ये…

Share
ल्या आठवड्यात  शाओमीने सीसी-९ स्मार्टफोन प्रसारित केले होते. ही सिरीज युवा वर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. एमआय सीसी९९ आणि एमआय सीसी९ ई हे सुरुवातीचे हॅन्डसेट असणार आहेत.
नुकतीच या फोनचे फोटो आणि वैशिष्ट्य प्रसिद्ध करण्यात आली आहेत. हे  हॅन्डसेट इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर आणि ट्रिपल कॅमरा सेटअप सोबत असणार आहेत.

येणाऱ्या काळात Mi CC9 आणि Mi CC9eचे अनेक प्रकार मार्केट मध्ये दाखल होणार आहेत. त्यात Mi CC9 मध्ये ६ जीबी रॅम + १२८ जीबीची किंमत २६,२०० रुपये इतके असणार आहे.

८ जीबी रॅम + १२८ जीबी प्रकारातील किंमत २८,२०० रुपये असणार आहे. तसेच ८ जीबी + २५६ जीबी प्रकाराची किंमत ३१,३०० रुपये इतकी असणार आहे. तर दुसरीकडे Mi CC9e ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी १६,१०० रुपयात उपलब्ध असणार आहे. याच फोनचे ६ जीबी + १२८ जीबीची किंमत १९,२०० रुपये इतकी असणार आहे. तर ८ जीबी +१२८ जीबीची किंमत २२,२०० हजार रुपये असणार आहे.

Mi CC9 वैशिष्ट्ये 

शाओमी Mi CC9 आणि Mi CC9eचे स्पेसिफिकेशन देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. Mi CC9  अड्रॉइड पाय वर आधारित Mi यूआय 10 सॉफ्टवेअर वर  चालेल. यात 6.39 इंचीचा  फुल-एचडी + (1080×2340 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले असणार आहे. हॅन्डसेट स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर सोबत 4,000 एमएएचची बैटरी सोबत असेल असा दावा करण्यात आला आहे.

Mi CC9 मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. मागच्या बाजूला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर, 16 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 12 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर असणार आहे. या फोन मध्ये फ्रंट पॅनलला 32 मेगापिक्सलचा सेंसर असेल. फोनला  इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, आईआर ब्लास्टर, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि हाइ-रेज़ ऑडियो सपोर्ट देण्यात आला आहे.

Mi CC9e वैशिष्ट्ये

Mi CC9eला 5.97 इंचचा  फुल-एचडी + (1080×2340 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर सोबत 3,500 एमएएचची बैटरी देण्यात येण्याची शक्यता आहे.

बॅटरी 18 वॉटची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ट्रिपल रियर क्र सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा Sony IMX583 सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा  तीसरा सेंसर असेल. बाकी स्पेसिफिकेशन Mi CC9 सारखेच असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!