एमएचटी सीईटी 11 मे रोजी

0
नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी दि.11 मे रोजी होत असून, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या हाती अवघे तीन दिवस शिल्लक आहे. जिल्ह्यातून 20 हजार 575 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. शहरातील 49 केंद्रांवर ही परीक्षा होईल.

11 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. या वेळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) हे पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या नियोजनासाठी शहरात 49 परीक्षा केंद्रांवर सुमारे 1200 अधिकारी कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अभियांत्रिकी/ तसेच औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्य शासनाने सीईटी प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमानुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रवेश परीक्षेकरिता तीन प्रश्नपत्रिका असतील. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी 50 गुण असलेली सामायिक प्रश्नपत्रिका असेल; तर गणित 100 गुण आणि जीवशास्त्र 100 गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहेत. सीईटीसाठी गेल्या वर्षभरापासून तयारी केली आहे.

कॉलेजव्यतिरिक्त स्पेशल ट्युशन्स आणि स्वयं अध्ययनाच्या काटेकोर वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे शेड्यूल वर्षभर व्यस्त राहिले. या प्रयत्नांना अंतिम टप्प्यात बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मॉक टेस्ट सोडविण्यासोबतच किचकट वाटणार्‍या संकल्पनांनाही विद्यार्थ्यांकडून उजळणी देण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांना नुकतचे प्रशिक्षण देण्यात आले.

LEAVE A REPLY

*