Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आजपासून एमएचटी सीईटी परिक्षेला सुरुवात

Share

नाशिक | प्रतिनिधी

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची प्रवेश परीक्षा आजपासून 13 मे दरम्यान घेतली जाणार आहे. या मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग-इनमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले होते.

ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये तफावत असेल त्यांना परीक्षा केंद्रावर हमीपत्र सादर करावे लागणार असून नावामधील बदल, उमेदवाराचे छायाचित्र, उमेदवाराची सही आदी दुरुस्ती असल्यास त्याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे सीईटी सेलने म्हटले आहे.

एमएचटी सीईटीसाठी राज्यभरातील 36 जिल्ह्यांत 170 केंद्रे असतील. परीक्षेसाठी सीईटी सेलकडे तब्बल चार लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.

राज्यभरातून पीसीएमसाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) एक लाख सात हजार 204 तर पीसीबीसाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) एक लाख 19 हजार 992 आणि पीसीएमबीसाठी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र) एक लाख 69 हजार 428 अर्ज प्राप्त झाले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!