म्हाडाची 80 घरे पोलिसांसाठी हस्तांतरीत

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 मध्ये उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या स्किममधील 80 घरे आज श्रीरामपुरातील पोलिसांसाठी हस्तांतरीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी तेजस चव्हाण होते.
श्रीरामपुरातील मध्यमवर्गीय लोकांसाठी म्हाडाची स्किम राबविण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या घरांसाठी सोडत पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाकडे पोलीस खात्याने पोलिसांसाठी घरे मिळावीत, अशी लेखी मागणी केली होती, ती मागणी मान्य होऊन शासनाने 80 घरे पोलिसांना देण्याची तयारी दर्शविल्यानंतर शासनाच्यावतीने म्हाडाकडे रितसर पैसे भरल्यानंतर ही 80 घरे आज मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात पोलिसांना हस्तांतरीत करण्यात आली.
म्हाडाचे शाखा अभियंता सोनार यांच्याहस्ते अप्पर अधीक्षक रोहिदास पवार यांच्याकडे ही घरे हस्तांतरीत करण्यात आली. या कार्यक्रमास खा. सदाशिव लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, डिवायएसपी अरुण जगताप, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, तहसीलदार सुभाष दळवी, मुख्याधिकारी सुमंत मोरे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, महावितरणचे अधिकारी शरद बंड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे, तालुक्याचे पोलीस निरीक्षक वसंतराव पथवे, पी.एस.आय. राऊत, भोसले, शिंदे तसेच पोलीस कारकून गोरक्षनाथ साबदे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, मुख्तार शाह, राजेंद्र पवार, आदित्य आदिक यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*