Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुख्यमंत्री भाजपचाच होईल : देवेंद्र फडणवीस

Share
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिले नसून मुख्यमंत्री भाजपचाच होईल असे म्हटले आहे. वर्षा निवासस्थानी दिवाळी निमित्त पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येणार नाहीत. सरकार स्थापनेबाबत आमच्या चर्चा अजून झाल्या नाहीत. उद्या नेता निवड झाल्यानंतर आम्ही माध्यमांना नेहमीप्रमाणे धक्का देऊ.
मुख्यमत्री फडणवीस म्हणाले की, शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही ज्या काही चर्चा आहेत त्या माध्यमात होत आहेत, त्यामुळे 1995 चा फॉर्मूला वैगरे काहीही ठरलेले नाही. शिवसेना काँग्रसे राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन कऱण्याचा पर्यांय निवडेल का याबाबतच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही काँग्रेस सेनेसोबत जात नाहीत असे त्यांनी जाहीर केले आहे.
सेनेसोबत आम्हीच जाऊन सरकार बनवू. सामना वृत्तपत्रात संपादक संजय राऊत यांनी भाजपवर केलेली टीका योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वृत्तपत्र म्हणून आम्ही त्याला फारशी किंमत देत नाही परंतु पक्ष म्हणून आम्हाला ती मान्य नाही आमची नाराजी योग्यवेळी आम्ही व्यक्त करू, मुख्यमंत्री म्हणाले की, अशी टीका सामना मधून काँग्रेस राष्ट्रवादीवर का होत नाही याचेही त्यांनी उत्तर द्यावे.
सेना भाजप युती करून लढले असल्याने आपसातील काही मुद्दे असू शकतात मात्र ते योग्य ठिकाणी चर्चा करून सोडवता येतील असे ते म्हणाले. निवडणुक निकालात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही हे मान्य करताना त्यांनी भाजपचा स्ट्राईक रेट वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, 2014 मध्ये 260 जागा लढवून आम्ही 122 जिंकल्या होत्या. यावेळी 160 लढवून 105 जिंकल्या आहेत त्यामुळे भाजपच्या अपयशाची माध्यमात होणारी चर्चा गैरलागू असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!