Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

#MeToo: सुभाष घर्इं व साजिद खानवरही अश्लिल गैरवर्तनाचा आरोप

Share
मुंबई : मी टू अभियानामध्येआता दिग्दर्शक सुभाष घई आणि दिग्दर्शक साजिद खान यांचीही नावे आली आहेत. सुभाष घई यांच्यावर त्यांचा माजी कर्मचाऱ्यानं बलात्काराचा आरोप केला आहे. सुभाष घर्इंनी एका चित्रपटाच्या शूटींगवेळी नशेत आपल्यावर बलात्कार केला, अशी आपबीती तिने सांगितली आहे. या महिलेचं नाव अजूनही समोर आलेलं नाही. तसेच दिग्दर्शक साजिद खान याच्यावर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यात एक्स-असिस्टंट सलोनी चोप्रा,अभिनेत्री रिचेल वॉईट आणि जर्नलिस्ट करिश्मा या तिघींचा समावेश आहे. गंभीर आरोप केले आहेत.

सुभाष घईबाबत काय म्हणाली पीडित महिला?

गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी घई मला सोबत घेऊन जात. अनेकदा ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माझ्या मांडीवर हात ठेवत अनेकदा मला मिठी मारत असत. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी मला बोलवत. त्यावेळी ते माझ्याशी अतिशय असभ्य वर्तन करात. पण त्यावेळी मला कामाची गरज होती आणि मी मी त्यांच्यासोबतचे काम सोडू शकत नव्हते. एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी मद्यसेवन केले. मलाही त्यांनी बळजबरीने मद्य दिले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले. ते मला घरी सोडत आहेत, असेच मला वाटले. पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी रडले आणि विरोधही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले.  मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र मी मधेच काम सोडले तर पैसे मिळणार नाहीत असे त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावे लागले, असे या महिलेने म्हटले आहे.

सुभाष घईने आरोप फेटाळले

सुभाष घर्इंनी बलात्काराचा हा आरोप फेटाळून लावला आहे. असत्य वा अर्धसत्य जुन्या कहाण्या जगासमोर आणून कुठल्याही व्यक्तीला खलनायक बनवणे जणू फॅशन झाले आहे. हे आरोप मी अमान्य करतो. मी निश्चितपणे मानहानी खटला दाखल करणार, असे त्यांनी म्हटले आहे.

साजिद बाबत काय म्हणाल्या पीडिता 

साजिद अश्लिल फोटो मागायला, अश्लिल मागण्या करायचा़ तो रात्री-बेरात्री कॉल करायचा. अश्लिल प्रश्न विचारायचा, लगट करायचा असे सलोनी चोप्राने म्हटले आहे. जर्ललिस्ट करिश्मानेही साजिदचा खरा चेहरा जगापुढे आणला आहे. एकदा मी मुलाखत घ्यायला साजिदच्या घरी गेले होते. मुलाखत झाल्यावर मी महिलांना कशाप्रकारे संतुष्ट करतो, हे साजिद मला सांगू लागला. डिव्हिडी घ्यायच्या बहाण्याने तो आत गेला़ बाहेर आला तेव्हा त्याची पॅन्ट उघडी होती. मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मला पकडले आणि बळजरीने किस करू लागला, असे करिश्माने लिहिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!