MeToo मूर्खपणा, इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाही- शिल्पा शिंदे

0

मुंबई :तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सुरु झालेल्या या #MeToo मोहिमेमुळे फिल्म इंडस्ट्रीतील अनेक नामांकित चेहरे अडचणीत आले आहेत. #MeToo मोहिमेतंर्गत अनेक महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेने #MeToo मोहिमेवर टीका केली आहे. #MeToo मोहिम एक मूर्खपणा आहे. इंडस्ट्रीमध्ये बलात्कार वैगेरे काही होत नसतो. दोन व्यक्तींमधये जे काही घडते ते सर्व संमतीने होते असे शिल्पा शिंदेने म्हटले आहे.

वृत्तवाहिनीशी बोलताना शिल्पा म्हणाली कि, ज्यावेळी तुमच्या बरोबर काही चुकीचे घडते त्याचवेळी तुम्ही बोलले पाहिजे. जेव्हा काही घडते तेव्हा तुम्ही शांत राहता आणि नंतर बोलता त्याचा उपयोग नाही. नंतर तुमचे म्हणणे कोणी ऐकणार नाही. त्यातून फक्त वाद उत्पन्न होईल. ही इंडस्ट्री वाईटही नाही आणि चांगलीही नाही. प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडत असतात. इंडस्ट्रीमध्ये जे काही होते ते संमतीने घडते. जर तुम्ही तयार नसाल तर विषय सोडून द्या असे शिल्पा म्हणाली.

 

LEAVE A REPLY

*