‘MeToo’ ला मिशेल ओबामांचा पाठिंबा

0

वॉशिंग्टन : MeToo या हॅश टॅगच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराबाबत रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची खिल्ली उडविली असताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मात्र या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. हे जग महिला आणि मुलींसाठी धोकादायक आहे. आता मात्र हद्द झाली”, अशा शब्दांत त्यांनी सध्यस्थितीबाबत भाष्य करत #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

*