आज अनुभवता येणार उल्कावर्षावाची आतषबाजी

0

मुंबई : नुकत्याच झालेल्या अभूतपूर्व चंद्रग्रहणानंतर आता नागरिकांना तारे पडताना पाहावयास मिळणार आहे. आज रात्री म्हणजेच मध्यरात्रीनंतर ३ वाजता उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहे. ययाती तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव चंद्रप्रकाशाचा अडथळा नसल्याने अधिक प्रेक्षणीय दिसणार आहे. ईशान्य म्हणजे पूर्व-उत्तर क्षितिजावर ययाती तारकासंघातून हा उल्कावर्षाव दिसेल.

वर्षभरात 10 ते 12 उल्कावर्षाव होत असतात. पृथ्वी धूमकेतूच्या कक्षेत आली की हा उल्कावर्षाव होतो. लघुग्रहांचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच पेट घेतात त्यामुळे ते उल्का तेजस्वी दिसू लागतात. आकाश निरभ्र असल्यास तासाला साठ ते सत्तर उल्का पडताना दिसू शकतील असे खगोल अभ्यासकांनी सांगितले आहे.

असा अनोखा अनुभव घ्यावयाचा असेल तर मोकळ्या ठिकाणी किंवा डोंगरावर जाऊन याचा आनंद घेऊ शकता

LEAVE A REPLY

*