VIDEO : ‘मेरे रश्के कमर’चे रिक्रिएटेड व्हर्जन प्रदर्शित!

0

कितीही नवनवीन गाणे आले तरी काही गाण्यांचं स्थान मात्र तसेच असतं. अशाच काही गाण्यांमधील एक म्हणजे ‘मेरे रश्के कमर’. काही वर्षांपूर्वी सुफीयाना आवाजाने बादशहा नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचं हे सुरेख रिक्रिएटेड व्हर्जन आहे.

इलियाना डिक्रूझ आणि अजय देवगण यांची केमिस्ट्री या गाण्यातून पाहायल मिळत आहे.

‘जुबान और जान सिर्फ एक ही बार दी जा सकती है’, असं म्हणत अजय देवगण पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

राजेशाही थाट, प्रेम, आर्तता आणि त्यातून या दोघांचं खुलणारं प्रेम या सर्व गोष्टींचा मेळ ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यात साधण्यात आलाय.

‘बादशाहो’ चित्रपट अॅक्शन थ्रिलर या प्रकारात मोडत असून अजय देवगण, इमरान हाश्मी, इलियाना डिक्रूझ, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल हे कलाकार यात झळकणार आहेत.

LEAVE A REPLY

*