नाशिक @९.८ अंश सेल्सियस; संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी पारा चार अंशांनी घसरला

file photo
file photo

नाशिक | प्रतिनिधी 

शहर व परिसरात थंडीचा रात्रीपासून गारठा वाढला आहे. अवघ्या चोवीस तासांतच नाशिकमधील तपमानाचा पार जवळपास चार अंशांनी घसरला आहे.नाशिककरांना गुरुवारी हुडहुडी भरली तर कमाल तापमानातही काल सायंकाळी घट झालेली बघायला मिळाली आहे. वातावरणात गारठ्यासोबतच वाराही वाहत असल्यामुळे बोचऱ्या थंडीचा अनुभव आज नाशिककरांना आला.

डिसेंबर उलटून देखील म्हणावी तशी थंडी पडत नव्हती. परंतु संक्रांती झाल्यानंतर लगेचच थंडीचा पार घसरल्यामुले येणाऱ्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

आजच्या नाशिकमधील थंडीने यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली असून नाशिक शहर आणि परिसरात आज ९.८ एवढे तपमान नोंदवले गेले.

थंडी जाणवू लागल्याने नागरिकांनी उबदार कपडे बाहेर काढले असून शहरात स्वेटर, मफलर, टोपी असे उबदार कपडे परिधान करून नाशिककर घराबाहेर पडलेले दिसून आले.

हेल्थी सीजन म्हणून हिवाळा ओळखला जात असल्याने थंडीच्या माहोलमध्ये मैदानावर व्यायाम, प्राणायाम, योगासन करणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. येणाऱ्या काही दिवसांत थंडीचा उच्चांक बघायला मिळेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांतील तापमान

दिनांक         किमान    कमाल

15 जानेवारी 13.4℃   25.9℃

14 जानेवारी 15.0℃   25.8℃

13 जानेवारी 15.5℃   27.5C

12 जानेवारी 13.5℃   28.6℃

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com