मर्सीडीझच्या आलिशान ‘एजीएम’चे सादरीकरण

0

नाशिक । दि. 5 वा. प्र. – उच्चभ्रूंची  पहिली पसंत असलेल्या मर्सीडिझ बेंझ कारच्या एजीएम श्रेणीतील दोन आलिशान कारचे सादरीकरण इंडिश मोटरचे व्यवस्थापकीय संचालक ओम मोहरीर यांनी केले.

देशातील क्रमांक एकची लग्झरी कार उत्पादक कंपनी असलेल्या मर्सीडीझ बेंझने आपल्या आलिशान कारमध्ये दोन नवीन कारची नुकतिच भर घातली. त्यामध्ये एजीएम जीएलसी-43 आणि एजीएम एसएलसी-43 या दोन कारचा समावेश असून अल्पवधीतीच या कार ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

इंडिश मोेटरेन 3 एस लग्झरी कारचे सादरीकरण केले.

देशातील पश्चिम विभागात मर्सीडिझ कंपनीच्या कारची 35 टक्के विक्री होते. नाशिकमध्ये सध्या 700 मर्सीडीझ कार ग्राहक आहेत.

एएमजी जीएलसी-43 आणि एएमजी-एसएलसी-43 या आरामदायी आलिशानच्या सादरीकरणानंतर बोलतांना इंडिश मोटरेनचे व्यवस्थापनकीय संचालक ओम मोहरीर म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून मर्सीडीझ बेन्झ परिवाराचा भाग असल्याचा आम्हाला सार्थ आनंद आहे.

काही वर्षांपूवी पन्नाशी उलटलेल्या यशस्वी व्यक्ती आमच्या ग्राहक होत्या परंतु आता यशस्वी तरुणांचा मर्सीडीझ कार घेण्याकडे कल वाढला आहे. देशात ही कार घेणार्‍याचे सरासरी वय 35 आहे असे सांगून नाशिककरांच्या लग्झरी कारची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी इंडिश मोटरेन कटिबद्ध असून ग्राहकांचे संतुष्टी हेच आमचे ध्येय असणार आहे.

ओपन स्पोर्टस कार
नाशिकमध्ये विकल्या जाणार्‍या प्रत्येक 2 मर्सीडिझ-बेंझ चारचाकीपैकी एसयूव्ही आणि जीएसएल हे दोन मॉडल्स नाशिककरांचे आवडते आहेत. नव्याने सादर झालेली एएमजी एसएलसी-43 ही स्पोटर्स कार असून रिमोटद्वारे नियंत्रित होणार्‍या या कारमध्ये पूर्णपणे ‘ओपन’ करण्याची सुविधा देण्यात आल्याने ग्राहकांना खुल्या वातावरणात मुक्त सफरीचा आनंद घेता येतो. त्यामुळे ग्राहकांसाठी ही कार आकर्षणाचे केंंद्र ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*