पॅडमॅन चित्रपटानंतर राधिका आपटे म्हणते…

0
पॅडमॅन चित्रपटाची जबरदस्त घोडदौड सुरु असून पहिल्याच दिवशीपासूनच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमवला. मासिक पाळी संदर्भातील शंका कुशंका दूर करत समाजातील महिलांमध्ये या चित्रपटाद्वारे जनजागृती करण्यात आली असून यातून महिलांमध्ये नेहमी समोर असणाऱ्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये जरी संस्कृती आणि समाजाचे कारण दाखवत पॅडमॅनवर बंदी घालण्यात आली असली तरी. भारतात मात्र चित्रपटामुळे जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे राधिका म्हणते. देशातील ८२ टक्के महिला आजही सॅनिटरी पॅडचा वापर करीत नाहीत, यावर मात्र राधिकाने नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने सॅनिटरी पॅडवरचा कर कमी केला असला तरी यातून ग्रामीण भागात पोहोचण्यात यश मिळेल असे वाटत नाही. उलट जर ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड मोफत दिले तर यातून ही संख्या कमी होऊन महिलांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते.

LEAVE A REPLY

*