Type to search

Featured maharashtra आवर्जून वाचाच सार्वमत

स्मृतीभ्रंशावर उपचार; नगरसह 28 जिल्ह्यांत मेमरी क्लिनिक

Share
मुंबई – अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समुपदेशनासाठी राज्यातील नगरसह 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, 300 रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशभरात अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात 4.1 दशलक्ष रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक  सुरू करून त्या माध्यमातून अल्झायमरविषयी अर्ली डिटेक्शन सेंटर सुरू झाले आहे. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. स्मरणशक्ती विषयी येणार्‍या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केल्यानंतर रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतो.

स्मृतीभ्रंश आजारावर वेळीच औषधोपचारासाठी मेमरी क्लीनिक सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आजारासंबंधी तपासणी रोज केली जाते; मात्र स्मृतिभ्रंशसंबंधी आजाराच्या रुग्णांची आठवड्यातून दोन दिवस तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, नाशिक, सिंधुदुर्ग, वर्धा, नंदूरबार, सातारा, चंद्रपूर, पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!