समृद्धी महामार्ग : संघर्ष समितीची उद्या नाशकात बैठक

0
नवीन नाशिक (प्रतिनिधी) | सोमवार दिनांक १७ रोजी होणाऱ्या समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आयटक कामगार केंद्र येथे बैठक घेण्यात येणार आहे.

येथील राजे संभाजी क्रीडासंकुलाजवळील मानव सेवा केंद्र, सिंहस्थनगर, येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत समृद्धी महामार्ग बाबत सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

दु.१२ ते १ वेळेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिनिधी नोंदणी केली जाणार असून सर्व जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधी चे मत जाणून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा सर्वानुमते ठरविली जाणार आहे.

बैठकीत झालेले निर्णय दुपारी ४ वा होणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या २ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भातील माहिती देखील पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे.

समृद्धी बाधित शेतकऱ्यांसह पंचक्रोशीतील सर्वच शेतकऱ्यांनी मोठया संख्येने बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे राजू देसले, कचरू पाटील, सोमनाथ वाघ, ऍड. रतनकुमार एचम, शांताराम डोकने, ज्ञानेश्वर काळूगे, किरण हरक, अरुण गायकर, भाऊसाहेब घोटेकर, आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*