प्रश्‍न विचारल्याने सभासदाला मारहाण : सैनिक बँकेच्या सभेतील प्रकार

0

गुन्हा दाखल

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधरण सभेत चुकीच्या कारभारावर प्रश्न का विचारतो, असे म्हणून कर्मचारी अनिल मापारी व अन्य दोन कर्मचार्‍यांनी सभासद विनायक गोस्वामी यांना मारहाण केल्याची घटना घटना घडली. याप्रकरणी विनायक गोस्वामी यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैनिक बँकेची शुक्रवारी वार्षिक सभा होती. त्या सभेत सभासद विनायक गोस्वामी यांनी बँकेत झालेल्या गैर कारभारावर मुद्देसूद प्रश्न विचारले. त्यांचा राग येऊन अनिल मापारी व अन्य दोन कर्मचारी यांनी विनायक गोस्वामी यांना भर सभेत मारहाण केली.
कर्मचारी मारहाण करत असताना शेजारील काहींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले. मात्र सभा संपल्यानंतर विनायक गोस्वामी यांनी पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन अनिल मापारी व इतर दोन जणांविरोध मारहाण केल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

सहकार विभागाकडे दाद मागणार –  सैनिक बँकेत अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी व इतर भ्रष्ट कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत व त्यांची चौकशी सुरु आहे. त्यासंबधी मी वार्षिक सभेत शासकीय ऑडिट रिपोर्ट मध्ये आलेल्या शे़र्‍यावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. मात्र अध्यक्ष व्यवहारे यांच्या इशार्‍यावरून या कर्मचार्‍यांनी  मला मारहाण केली. मात्र या दडपशाहीला न जुमानता आपण विना परवानगी गुंतवलेली म्युच्यूअल फंडातील 56 लाख रुपये रक्कम व त्यांचा झालेला सुमारे एक कोटीचा तोटा याबाबत सहकार विभागाकडे तक्रार करणार असून याची चौकशी जलदगतीने होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.- विनायक गोस्वामी (सभासद, सैनिक बँक, निघोज)

LEAVE A REPLY

*