‘MeToo’ चळवळीवर चित्रपट; आलोकनाथ बनणार न्यायमूर्ती

0
मुंबई – काही दिवसांपूर्वी #MeToo मोहिमेचे वादळ बॉलिवूडमध्ये सुरू होते. यादरम्यान अनेक कलाकारांचे खरे चेहरे जगासमोर आले. आता चित्रपटसृष्टीतील याच वास्तवावर आधारित चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे मीटू मोहिमेतून ज्यांच्यावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला, असे आलोक नाथ या चित्रपटात न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘#मैं भी’ असं या चित्रपटाचं नाव असून आलोकनाथ यांनी नुकतंच चित्रीकरणही पूर्ण केलं. या वृत्ताला दुजोरा देत आलोक नाथ म्हणाले की, ‘मी या चित्रपटाचे चित्रीकरण मागेच पूर्ण केले होते. माझ्या एका गरीब निर्मात्या मित्रासाठी मी ही भूमिका स्वीकारली. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तुम्हाला ती पाहायला मिळेल. परंतु, मी एखाद्या चित्रपटात काम करतोय तर यात गैर काय?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला आणि सिनेसृष्टीत खळबळ उडाली. सोशल मीडियावरील ‘मी टू’ मोहिमेत उडी घेत लेखिका विन्ता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर आरोप करत बलात्काराचा गुन्हादेखील दाखल केला.

 

LEAVE A REPLY

*