मेडिकलची प्रवेशप्रक्रिया आजपासून होणार सुरू

0

नाशिक, दि.27, प्रतिनिधी  नीट परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. राज्यातील सर्वच शासकीय, खासगी संस्थांमधील जागांसाठी हे प्रवेश होणार आहे.

एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस तसेच बीयुएचएस, बीपी अ‍ॅण्ड ओ तसेच नर्सिं अशा सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला आज दि 28 जूनपासून प्रारंभ होत आहे.

उत्तर महाराष्ट्राचा विचार करता धुळयात एक शासकीय तर चार खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा पर्याय विद्यिार्थ्यांसमोर आहे. अर्ज भरण्याबाबत आरोग्य विभागाच्या डीएमईआर या संकेतस्थळावर सर्व माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. यात प्रवेशप्रक्रियेसह अन्य जागांची माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे एमबीबीएस तसेच बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट निश्चित करण्यात आलेली आहे.

एमबीबीएस, बीडीएस तसेच बीएएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या गटातील विद्यिार्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्रात सरासरी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

तर राखी प्रवर्गातील उमेदवारास 40 टक्के गुण असणे आवयक आहे. बीएसस्सी नर्सिंग साठी तीनही विषयात 45 %, राखीव प्रवर्गासाठी 40 टक्के गुण असणे आवश्यक आहे. बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी तरेच बीपी अ‍ॅण्ड ओ या शिक्षणसाठी 12वी उत्तीर्णतेची पात्रता आहे.

LEAVE A REPLY

*