45 वर्षांवरील पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांची होणार वैद्यकीय तपासणी

0

खर्चाची मर्यादा 500 रुपये, 1 जुलै ते 30 सप्टेंबरची मुदत

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य पोलीस दलातील 45 वर्षे व त्या वयावरील अधिकारी, कर्मचार्‍यांची वर्ष 2017-18 मध्ये शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.
या तपासण्यांवरील खर्चाची मर्यादा 500 रुपये राहणार आहे. पोलीस प्रमुखांनी जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग यांच्याशी समन्वय ठेवून दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत वैद्यकीय तपासणी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे पोलीस महासंचालक व आरोग्य सेवेच्या संचालकांनी स्वतंत्रपणे सूचना देण्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

या होणार तपासण्या-
रक्त, रक्त शर्करा प्रमाण, लिपीड, प्रोफाईल, यकृत, किडनी, मौखिक आजार, डोळे, रक्तदाब, ब्रॉकायटीसच्या रुग्णांसाठी छातीचा एक्सरे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांसाठी ईसीजी 

LEAVE A REPLY

*