सर्व्हर डाउनमुळे परिक्षा झाली रद्द; एमएड परिक्षांर्थींचा संताप; परिक्षा समन्वयकाला घेराव

0

नाशिक : सर्व्हर डाउनमुळे एमएड प्रवेश सीईटीसाठी घेण्यात येणारी परिक्षा ऐनवेळी रदद करावी लागली. मात्र परिक्षेसाठी सकाळी 12 वाजता आलेल्या परिक्षार्थींना मात्र सायंकाळी 6 वाजता ताटकळत ठेवण्यात आले.

इतकेच नव्हे तर त्यांना दिवसभर इतर केंद्रावर भटकंतीही करावी लागली. सायंकाळी 6 वाजता ही परिक्षा रदद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी संताप अनावर झालेल्या परिक्षार्थींनी समन्वयकाला धारेवर धरले. यामुळ गोंधळ निर्माण झाला होता. विशेष म्हणजे परिक्षेसाठी बाहेरील जिल्हयातून आलेल्या परिक्षार्थी महीलांचे मात्र खुप हाल झाले.
बीएडनंतर एमएड करणारया विद्यार्थ्यांसाठी शासनाने ऑनलाइन सीईटी अनिवार्य केली आहे़ या सीईटी परीक्षेसाठी सिडको व इंदिरानगरमधील डे केअर स्कूल असे दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते़ संपूर्ण नाशिक विभागातून या परीक्षेसाठी सकाळीच परीक्षार्थी शहरात दाखल झाले होते़ सिडकोतील परीक्षा केंद्रावर ऑनलाइन सीईटीची परीक्षा सुरळीत पार पडली;

मात्र इंदिरानगरमधील डे केअर स्कूलमधील कॉम्प्युटर सेंटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने तेथील संपूर्ण संगणक यंत्रणाच बंद पडली़ 12 वाजता सर्व्हर डाउन झाल्याने काहीवेळाने परिक्षा घेण्यात येईल असे सांगण्यात आले. परिक्षा देण्यासाठी आलेले परिक्षार्थी याकरीता केंद्रावरच बसून होते. काही तासानंतर इंदिरानगर केंद्रावरील परीक्षार्थींना ऐनवेळी परीक्षेसाठी दिंडोरी रोडवरील प्रो स्कील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले़ मात्र या इन्स्टिट्यूटमधेही त्याच समस्येला परिक्षार्थींना सामोरे जावे लागले.

सर्व्हर डाऊन झाल्याचे कारण सांगून थोड्याच वेळात परीक्षा सुरू होईल, असे करता-करता सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत परीक्षार्थींना ताटकळत ठेवण्यात आले़ यामुळे परीक्षार्थींचा संताप अनावर झाला होता़ विशेष म्हणजे या परीक्षेसाठी इतका मोठा गोंधळ होऊनही समन्वयक पावणेसहा वाजता परीक्षा केंद्रावर दाखल झाले़ सीईटी परीक्षा समन्वयकाने परीक्षार्थींना सहा वाजता पुढील परीक्षेची तारीख कळविण्यात येईल, असे सांगून परीक्षार्थींची बोळवण केली़ सकाळपासून परीक्षार्थींना ताटकळत ठेवणाजया परीक्षा समन्वयकांवर परीक्षार्थींनी चांगलाच संताप काढल्याने या सेंटरवर मोठा गोंधळ झाला होता़

LEAVE A REPLY

*