Friday, May 3, 2024
Homeनाशिकग्रामीण भागातही आढळले गोवरसदृश्य रुग्ण

ग्रामीण भागातही आढळले गोवरसदृश्य रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरापाठोपाठ गोवरने(Measles) ग्रामीण भागातही शिरकाव केला असून आठ रुग्णांना गोवरसदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.

- Advertisement -

नाशिक शहरात चार रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्यानंतर मंगळवारी (दि.२२) ग्रामिण भागात आठ रुग्णांना गोवरसदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने जमा करण्यात आली आहेत.हे नमुने मुंबई येथे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली.

राज्यात गोवरने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता गोवरची लक्षणे असलेले रुग्ण आढळूनआल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

असे आहेत गोवर रुग्ण

जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, निफाड येथे प्रत्येकी २ तर चांदवड आणि मालेगाव येथे प्रत्येकी १ रुग्णाचे लक्षण गोवरचे आढळून आले आहे.या सर्व रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.

गोवरची लक्षणे

लहान बालकांमध्ये गोवरचे प्रमाण आढळुन येत असुन ताप, सर्दी, थंडी, खोकला, अंगावर पुरळ येणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

गोवरला प्रतिबंध करण्यासाठी अशी घ्या काळज़ी

– गोवरची लागण झालेल्या बालकांचे विलगीकरण करण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य केंद्रांवर लसी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 5 वर्षाच्या आतील बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

लसीकरण हाच प्रभावी उपाय

गोवर या आजारावर लसीकरण हाच प्रभावी उपाय असुन सर्व तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 5 वर्षाच्या आतील बालकांचे त्वरीत लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन गोवर टाळता येईल. बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर विसंबुन न राहता बालकांना त्वरीत आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करावे.

– डॉ. हर्षल नेहते,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या