Type to search

Me Too : साजिदनं ‘हाऊसफुल ४’चं दिग्दर्शन सोडलं

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

Me Too : साजिदनं ‘हाऊसफुल ४’चं दिग्दर्शन सोडलं

Share
मुंबई : महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी दिग्दर्शक साजिद खानवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर बॉलिवूड पुन्हा एकदा हादरलं आहे. साजिदवरच्या आरोपानंतर अक्षयनं तातडीनं ‘हाऊसफुल ४’चं चित्रिकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे साजिदनं सारी नैतिक जबाबदारी स्वीकारत हाऊसफुलच्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत असल्याचं ट्विट केलं आहे.

अभिनेत्री सलोनी चोप्रा हिनं देखील दिग्दर्शक-निर्माता साजिद खानवर लैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे. २०११मध्ये साजिद खानच्या एका चित्रपटात सलोनी चोप्रानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. त्या दरम्यान साजिदनं गैरवर्तन केल्याचं तिनं जाहीर केलं. यानंतर साजिदनं टि्वट केलं की, ‘या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर माझं कुटुंब, निर्माते, हाऊसफुल ४ चे कलाकार यांचा दबाव आणि या आरोपांनंतरची नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करत नाही तोपर्यंत या सिनेमाचं दिग्दर्शन सोडत आहे. माझी सर्व मित्रांना आणि माध्यमांना विनंती आहे की सत्य बाहेर येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका.’

साजिदवर होत असलेल्या आरोपांमुळे अभिनेता अक्षय कुमारनं ‘हाऊसफुल ४’ चं चित्रीकरण पूर्णपणे थांबवण्याची विनंती निर्मात्यांना केली आहे. तसेच लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत काम करणार नसल्याचंही अक्षयनं म्हटलं आहे. लैंगिक गैरवर्तणुकीसारखे प्रकार खूपच गंभीर आहेत या प्रकरणात कडक कारवाई होणं गरजेचं आहे असंही अक्षयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!