Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

एमडीएचचे धरम पाल गुलाटी यांच्या निधनाची अफवाच

Share

नवी दिल्ली :एमडीएच मसाल्यांच्या जाहीरातीतील मोठ्या मिशांचे राजस्थानी आजोबा हे घराघरातील एक ओळखीचा चेहरा बनले. एमडीएच मसाल्यांचे मालक असलेले ते आजोबा म्हणजेच महाशय धरम पाल गुलाटी यांचे शनिवारी रात्री दिल्लीत निधन झाल्याची अफवा पसरवण्यात आली.

त्यामुळे समाज माध्यमांवर देखील निधनाची बातम्या झळकत होत्या, परंतु ती एक अफवा असल्याचे उघड झाले आहे. परंतु गुलाटी हे आजही अगदी न चुकता कारखान्यात, बाजारात जातात आणि डीलर्सनाही भेटतात, अगदी रविवारीही.

चुन्नी लाल गुलाटी यांचे खरे नाव धर्मपाल गुलाटी असे होते. त्यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे 1922 मध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात एमडीएच मसाले हा एक ब्रँड आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. चुन्नी लाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या 15 कंपन्या आहेत.  त्याशिवाय, दुबई आणि लंडनमध्येही ‘एमडीएच’ कंपनीचे कार्यालय आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!