Friday, May 3, 2024
Homeजळगावमाझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा डंका

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा डंका

लालचंद अहिरे – Jalgaon

माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची पाच गटात स्पर्धा घेण्यात आली होती.

- Advertisement -

यात सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ.बी.एन.पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. तसेच कोरोनाच्या कठीण काळात माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव जिल्ह्याने महत्वपूर्ण कामगिरी केली असून राज्यासह नाशिक विभागातून माझी वसुंधरा अभियानात जळगाव जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट कामगिरीचा डंका वाजला आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सरपंच,नगराध्यक्ष आणि लोकसहभागातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुस्कार ग्रामपंचायत चिनावल ता.रावेर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत उत्तेजनार्थ प्रथम पहुरपेठ, ता जामनेर, सर्वोत्तम नगरपंचायत उत्तेजनार्थ द्वितीय मुक्ताईनगर नगर पंचायत तर सर्वोत्कृष्ट नगरपरिषद जामनेर तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यात राज्यातून 31 पुरस्कारांपैकी एकूण 6 पुरस्कार जळगाव जिल्ह्याच्या वाटेला मिळाली आहेत. उल्लेखनीय म्हणजे 2 प्रथम पुरस्कार, 2 तृतीय पुरस्कार व 2 उतेजनार्थ पुरस्कार मिळाली आहेत. जळगाव जिल्ह्याने कोरोनाच्या काळातही सर्वोत्तम कामगिरी केली.

दरवर्षी शहरासह जिल्ह्यात वृक्षारोपण लावून फोटोसेशन करण्यात येते. मात्र, वृक्षसंवर्धनासाठी जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतोय. कोरोनाच्या काळात जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासू लागला होता. त्यावेळी आपल्या रुग्णाला वाचविण्यासाठी नातेवाईकांची झोपच उडाली होती आणि प्रत्येकाला पर्यावणाचे महत्व कळाले. आतातरी कोरोनासह येणार्‍या विविध आपत्तीचा सामना करण्यासाठी भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे,एवढे मात्र खरे.

- Advertisment -

ताज्या बातम्या