Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महापौर उपमहापौरांना लॉटरी; निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या

Share
administration directed to seal illegally held properties

नाशिक | प्रतिनिधी

आगामी विधानसभा सार्वत्रिक न‍िवडणुकीमुळे महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या  आल्या आहेत.
विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महानगरपाल‍िकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात तीन महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यात ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी महापौर व उप महापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका (राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महानगरपालिकांचे महापौर व उपमहापौर पदांसाठीच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम- २०१९ हा अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये विद्यमान महापौरांना मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे लॉटरी लागली असून याआधी शहराच्या पहिल्या महापौर म्हणून मान मिळवलेल्या कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव, शिवसेनेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांना मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर अतिरिक्त कालावधीसाठी महापौरपदाची संधी मिळाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!