महापौर सायकलोथॉन ब्रह्मगिरी परिक्रमा पुर्ण

0

नाशिक । नाशिक महापालिकेच्या वतीने आज (दि.6) रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या महापौर सायकलोथॉन ब्रह्मगिरी परिक्रमा यशस्वीपणे पुर्ण झाली. या परिक्रमेत शहरातील सुमारे शंभर सायकलीस्ट सहभागी झाले होते.

आज गोल्फ क्लब येथील कै. अनंत कान्हेरे मैदानाजवळून सकाळी साडेसहा वाजता या सायकलोथॉनचा शुभारंभ उपमहापौर प्रथमेश गिते यांनी हिरवा झेंडा केला. यावेळी 100 सायलकीस्ट यांनी ब्रह्मगिरी परिक्रमेस सुरूवात केली.

त्याप्रसंगी नाशिक महापालिका शहर कार्यकारी अभियंता यु. बी. पवार, नितीन नागरे, शरद जोशी, डॉ. मनिषा रौदळ, तसेच सायकल प्रेमी उपस्थित होते.

कान्हेरे मैदानापासुन सायकलोथॉन सुरु होऊन त्र्यंबकच्या दिशेने निघाली. पुढे पेंगलवाडी, पहिने, कोजुर्ली, गौतम ऋषी बारी, दुगारवाडी फाटा, जव्हाररोड मार्गे त्र्यंबक याठिकाणी सायलीस्ट आले. त्यानंतर येथून सरळ नाशिकच्या दिशेने दुपारी 1 वाजता सर्व जण कान्हेरे मैदानात पोहचले.

अशाप्रकारे ही महापौर सायकलोथॉन ब्रह्मगिरी परिक्रमा यशस्वीपणे पुर्ण झाली. या परिक्रमेच्या दरम्यान आपोलो हॉस्पीटलच्यावतीने दोन अ‍ॅम्बुलन्स सायलीस्ट सोबत दिल्या होत्या.

तसेच फायर फॉक्स कंपनीने एक पिक अप व्हॅन, मान सायकल्स यांच्याकडुन दोन सायकल मॅकेनिक अशी व्यवस्था केली होती.

तसेच कैलास हिल्स रिसोर्ट यांच्यावतीने सहभागी सायकलीस्ट व आयोजकासाठी नाश्त्यांची व्यवस्था केली होती. तर ग्रेप कौटी रिसोर्ट यांच्यावतीने एनर्जी ड्रीक्सची व्यवस्था करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*